करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा निवडणुकीत २०१४ मध्ये नारायणआबा पाटील यांचा निसटता विजय झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांचा संजयमामा शिंदे यांनी पराभव केला. मात्र हाच पराभव जिव्हारी लागल्यानंतर २०२४ च्या विजयाचे शिल्पकार कामाला लागले. आणि आज विजयाने त्यांनी सर्वांना उत्तर दिले. नेमके या विजयाचे शिल्पकार कोण? असा प्रश्न अनेकांच्या मनात असले! ती व्यक्ती आहे आमचे मित्र अण्णा काळे! आमच्यात राजकीय मतभेद आहेत. मात्र ते माझे जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या रणनीतीमुळे आबांचा आजचा विजय सुखकर झाला आहे.
वास्तविक आम्ही पत्रकार मित्र आहोत पण आमचीही राजकीय मतं आहेत. आणि ती मतं कायम वेगळी राहिली आहेत. आमच्यात राजकीय मतभेद आहेत. ते मैत्रीत कधीच आणले नाहीत. यामध्ये विशाल घोलप यांचाही उल्लेख आवश्यक आहे. तिघांची राजकारणात मतं वेगळी पण एकमेकांच्या सुख दुःखात कायम बरोबर रहातो. आज हे सांगण्याचे कारण म्हणजे आज विधानसभा निवडणूकीचा निकाल झाला. त्यात माझ्या मताचा पराभव झाला मात्र मित्राच्या मताचा विजय झाला. फक्त विजयच नाही तर तेच या विजयाचे शिल्पकार आहेत.
२०१९ मध्ये पाटील यांचा पराभव झाला. त्याआधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली होती. त्यात प्रा. शिवाजीराव बंडगर यांच्या बंडखोरीमुळे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या सभापती पदाची संधी हुकली. त्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या. याचा ठपका पाटील यांच्यावर बसला होता. तो घालवण्याचा प्रयत्न काळे यांनी अनेकदा केला. पुढे २०१९ ची निवडणूक झाल्यानंतर शिंदे यांना रोखण्यासाठी त्यांनी बागल गटाला जवळ करण्याचा प्रयत्न केला. आदिनाथ बारामती ऍग्रोकडे जात होता तो रोखण्याच्या निमित्ताने त्यांनी तसा प्रयत्न केला. त्यात काही अंशी यश आले मात्र बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यावर हार न मानता काळे यांनी त्यांची रणनीती आखण्याचे काम सुरूच ठेवत जगताप यांच्याकडे संपर्क वाढवला त्याला काही अंशी यश आले. त्यांना एकाचवेळी मोहिते पाटील, पाटील, जगताप व बागल यांचा विश्वास संपादन करायचा होता. आणि ते आव्हान त्यांनी पेलले.
बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी ते सिद्ध करून दाखवले. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध करून त्यांनी जगताप यांची गेलेली बाजार समिती परत मिळवून दिली. तेव्हाच पाटील यांना आमदारकी मिळवून देण्याचा पण मनाशी बांधून काम केले. तेव्हा दुसरा एक डाव त्यांचा यशस्वी झाला होता. लोकसभा निवडणुकीतही शरद पवार यांना बाजार समितीत नेहाने हा त्यांचाच डाव होता. त्यामुळे जगताप यांचाही विश्वास वाढत गेला. अण्णा काळे सर हे प्रामाणिक काम करत होते. हा डाव शिंदे यांच्या लक्षात आला नाही.
विधानसभा निवडणुकीत काळे सर यांनी त्यांच्या मनात काय चालले आहे याचा कोणालाही अंदाज येऊ दिला नाही. बागल हे अर्ज दाखल करताना रश्मी बागल या तहसील कार्यालयात आल्या होत्या. तेव्हा महेश चिवटे हे देखील तेथे उपस्थित होते. तेव्हा ‘आपलं ठरलंय’ असं ते म्हणाले होते. त्याच वाक्यात सर्व घडामोडी दडल्या होत्या. हे करत असताना शरद पवार यांच्याशी ते संपर्क ठेऊन होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतर प्रमुख मंडळी यांच्याशी ते थेट संपर्क होते. आणि त्यांचा परिणाम दिसून आला.
पाटील यांच्यासाठी शरद पवार यांची सभा झाली त्याचे नियोजन त्यांनी केले. आज त्यांनी केलेल्या या मेहनतीमुळे आबा विजयी झाले मित्राचा यामुळे अभिमान आहे. साध्या कुटुंबातील आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ इच्छाशक्ती असले आणि मेहनतीत प्रामाणिकपणा असेल तर काय होते हे याचे उदाहरण आहे. त्यांचे मुळगाव आळजापूर आहे. पोटभरण्यासाठी त्यांचे वडील विहाळ येथे गेले होते तेथेच ते स्थायिक झाले. आज त्यांचे गाव विहाळ झाले आहे. मित्र काळे सरांना मनपूर्वक शुभेच्छा!
या विजयात काळे यांच्याशिवाय अनेकांची मदत आहे. हे नाकारता येणार नाही. मात्र करमाळ्यात निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी तहसील कार्यालय येथे पाटील यांचे आंदोलन झाले होते. आणि त्यात ‘सर का बरोबर हवेत’ यावर विधान केले होते. त्या आधी शिंदे यांनी चिखलठाण येथील सभेत फक्त सरांवर राजकारण चालत नाही असे विधान केले होते. या दोघांनी उल्लेख केलेले सर कोणते आहेत माहित नाही. पण आमचे मित्र काळे सर यांनी केलेली मेहनत उल्लेखनीय आहे आणि म्हणून या विजयाचे ते शिल्पकार आहेत असले वाटते.