Karmala Politics सावंत गटाच्या गटनेत्याचे नाव झाले फायनल!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहर विकास आघाडीचे (सावंत गट) गटनेते ठरले आहेत. सावंत गटाच्या विजयी झालेल्या नऊ नगरसेवकांच्या बैठकीत आज (गुरुवार) ही निवड करण्यात आली. संजय संवत यांच्या नावाला सर्वांनी सहमत दिल्यानंतर त्यांचे नाव करमाळा शहर विकास आघाडीने जाहीर केले आहे.

करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीचा २१ डिसेंबरला निकाल झाला. त्यात सावंत गटाच्या मोहिनी सावंत या नगराध्यक्षपदावर विजयी झाल्या. तर संजय सावंत यांच्यासह आठ नगरसेवक विजयी झाले होते. भाजपचे सात तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पाच नगरसेवक विजयी झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरले होते.

करमाळा नगरपालिकेत सावंत गटाने नगराध्यक्षपदावर विजयी मिळवला आहे. आता उपनगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नगरपालिकेत भाजप आणि सावंत एकत्र येणार आहेत. स्थानिक पातळीवर भाजपचे नगरसेवक व वरिष्ठ नेते यांच्यात याबाबत बोलणी सुरू आहेत. उपनगराध्यक्ष व इतर सत्ता स्थापन करण्यासाठी काय बोलणी होत आहे. याबाबत मात्र गोपनीयता पाळली जात आहे. दुसरीकडे सावंत गटाने विजयी नगरसेवक व काही महत्वाचे पदाधिकारी यांची आज बैठक घेतली. त्यात संजय सावंत यांचे गटनेता म्हणून नाव निश्चित केले आहे. उपनगराध्यक्षपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय सावंत हे नूतन नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांचे पती आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये ते नगरसेवक म्हणून सावंत गटाचे उमेदवार होते. करमाळ्यात सर्वाधिक मताने ते विजयी झाले होते. करमाळा शहरातील शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *