केळी पिक विम्याची प्रिमीयम रक्कम कमी करण्यात यावा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यामध्ये केळीचे प्रमाण जास्त आहे. वादळी वारा, पाऊस, दुष्काळी परिस्थिती अशा समस्येतून शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. काही दिवसात झालेल्या वादळी वाऱ्याने हजारो एकर केळीच्या बागा जमीन दोस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

केळीचा समावेश पिक विम्यामध्ये आहे. परंतु त्याचा प्रीमियम जास्त प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना प्रिमीयम भरण्यास अडचण निर्माण होते आहे. केळी पिकावरील प्रीमियम कमी केला तर शेतकऱ्यांना विमा भरणे शक्य होईल. शेतकऱ्यांना आसमानी संकटाशी तोंड देण्याला थोडा आधार मिळेल तरी केळीवरील प्रीमियम कमी करून शेतकऱ्यांच्या हितासाठी याविषयी गांभीर्याने निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रिमीयर कमी करण्यात यावा अशी मागणी भाजपाचे जिल्हा सचिव व प्रधान मंत्री पिक विमा तक्रार निवारण समितीचे सदस्य लक्ष्मण केकान यांनी केली आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, लेबर फेड्रेशनचे संचालक माणसिंग खंडागळे, भाळवणीचे वाघमारे, कुंभेजचे सातव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *