‘स्नेहालय’चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

करमाळा (सोलापूर) : स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन ‘अविष्कार २०२३- २४’ उत्सवात संपन्न झाले. यामध्ये चिमुकल्यांनी देशभक्ती, पारंपारिक गीते, लोकगीते, मराठी- हिंदी चित्रपट गीते सादर करत नृत्याविष्कार सादर केला. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आमदार संजयमामा शिंदे, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, उध्दव माळी, संस्थेचे रामचंद्र दळवी, मकाईचे माजी संचालक विवेक येवले, एकलव्य आश्रम शाळेचे अध्यक्ष रामकृष्ण माने, ऍड. अजित विघ्ने, डॉ. ब्रिजेश बारकुंड, साहित्यिक अंजली श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी शाळेच्या शिक्षिका शिंवागी कांबळे, शुभांगी खळदकर, अश्विनी महामुनी, अश्विनी पाटील, रुपाली जगताप, त्रिवेणी शिंदे, रोहिणी गरड, सविता पवार, अंजुम कांबळे, कृष्णा पवार, राहुल पलंगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार वलटे यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक सचिव धनश्री दळवी व आभार संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *