-

पुणे : रस्त्यावरील हातगाड्यांवरचे खाद्यपदार्थ खाणे आजवर अस्वच्छता आणि आजारांना निमंत्रण देणारी बाब ठरत होती. आता मात्र, एशियन कंट्रीज् चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणजेच अकोहीच्या प्रदीर्घ संशोधनातून आविष्कृत करण्यात आलेल्या अमृत या अत्याधुनिक हातगाडीमुळे या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. महाराष्ट्रात पुण्यात अमृत फूड कार्टचा पहिला परवाना वाघोली भागातील मे. शिंदे चौपाटी यांना प्रदान करण्यात आला.

अकोहीचे अध्यक्ष डॉ. सानी अवसरमल म्हणाले, रस्त्यावरील खाद्यपदार्थांची समस्या लक्षात घेता अमृत या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा हातगाडीची कल्पना आम्हाला सूचली. त्यावर अनेक वर्षे संशोधन व प्रयोग केल्यानंतर हे मॉडेल विकसित करण्यात आले. भारतच नव्हे तर आशिया, तसेच जगभरातील रस्त्यावरील संस्कृतीला या अभिनव व क्रांतिकारी संकल्पनेतून प्रगतीचा नवा स्पर्श लाभणार आहे. स्ट्रीट फूडच्या बाबतीत न्यूयॉर्क हे जगातील सर्वोत्तम शहर मानले जाते. तरीही, आम्ही विकसित केलेले मॉडेल जगभरात कुठेही आढळणार नाही, याची आम्हाला खात्री वाटते. अमृत फूडकार्ड या अत्याधुनिक हातगाडीचे हे उत्पादन आविष्कृत करण्यासाठी आम्हाला संशोधन आणि विकास प्रक्रियेत ७ वर्षे लागली. खाद्यपदार्थांची गरज, स्थिती, प्राधान्य, स्वच्छता, सुरक्षितता, ग्राहकांची पसंती आणि भारत सरकारचे धोरण या सर्व बाबींना केंद्रस्थानी ठेऊन आम्ही आमच्या प्रिय देशासाठी ही संकल्पना अत्यंत काळजीपूर्वक विकसित केली आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो.

या नावीन्यपूर्ण उत्पादनामुळे स्ट्रीट फूडच्या क्षेत्रात आपला भारत संपूर्ण आशिया खंडात अग्रेसर ठरु शकतो, असा आम्हाला विश्वास आहे. आपण भारतीय स्ट्रीट फूडसाठी ओळखलो जातो, मात्र आम्ही त्यास योग्य तो सन्मान देत नाही. आमच्या या प्रयोगातून आम्ही या क्षेत्राला तो सन्मान देऊ पाहतो आहोत. या फ्रॅंचायजी मॉडेलच्या माध्यमातून आमच्याशी जोडले जाणाऱ्या विक्रेत्यांनाही यातून आर्थिक स्वातंत्र्य लाभणार आहे, असेही डॉ. अवसरमल यांनी नमूद केले.

फ्रॅंचायजी मालकाविषयी- अमृत फूडकार्टफ्रॅंचायजीचे मालक असणारे राहुल शिंदे व प्रतिमा शिंदे हे दाम्पत्य मूळात तंत्रज्ञ असून त्यांनी एमबीए केलेले आहे. त्यांची शिंदे चौपाटी हा आपला व्यवसायाचा ब्रॅंड तयार केलेला आहे. रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने आणि प्रभावीपणे करता यावा, यासाठी त्यांनी व्यवसाय सुरु करतानाच बरेच संशोधन केले होते. अमृत फूडकार्ड या संकल्पनेला साकारण्यासाठी फ्रॅंजायची म्हणून शिंदे चौपाटीची निवड करण्यात आली. त्याविषयी बोलताना राहुल शिंदे म्हणाले, की हा आमच्यासाठी अत्यंत अविस्मरणीय दिवस आहे. आपल्या व्यवसायाची या उपक्रमासाठी निवड झाली, याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. अमृत फूडकार्डसाठी निवड होण्यापूर्वी आम्हाला त्यांच्या नियमावलीनुसार पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागल्या. पात्र झाल्यानंतर आम्हाला अमृत फूडकार्ड चालविण्यासाठीचा परवाना मिळाला. हा आमच्यासाठी आयुष्य बदलून टाकणारा अनुभव असणार आहे. कारण, आता आम्हाला खास कलिनरी आयडी मिळाल्याने आम्ही भारतीय हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे आता अविभाज्य भाग बनलेलो आहोत, याचा खूप आनंद आहे. परवाना मिळण्यासाठीची प्रक्रिया सोपी नव्हती. व्यवसायासाठीचे अनेक निकष, जसे की जागा, वातावरण, पार्श्वभूमी, शिक्षण, केवायसी, कायदेशीर बाबी आदींचा अमृत फूडकार्टच्या व्यवस्थापनाकडून बारकाईने अभ्यास केला गेला. त्यानंतरच परवाना देण्याचा निर्णय झाला. आम्ही आमच्या गाडीवर दाक्षिणात्य खाद्यपदार्थ व नाश्ता देणार असून अमृत फूडकार्टच्या मदतीने आम्ही या क्षेत्रात नवी झेप घेणार आहोत, असेही राहुल शिंदे यांनी नमूद केले.

खऱ्या अर्थाने हे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पडलेले पाऊल आहे. आम्ही ५० ते ७० लाख रु. दुसऱ्या फ्रॅंचाईजमध्ये गुंतवणार होतो. परंतु, अमृत फूडकार्डची गाडी केवळ २.६० लाख रुपये व व्यवसायाचा एकूण प्रकल्पखर्च पाच लाखांच्या घरात आहे, हे आम्हाला समजल्यानंतर आमचा आत्मविश्वास दुणावला. आम्ही या प्रकल्पासाठी मोदी सरकारच्या मुद्रा योजनेचाही लाभ घेऊ शकलो. अकोही आणि अमृत फूटकार्टची संकल्पना आम्ही जेव्हा आमच्या बॅंकेला सांगितली, तेव्हा त्यांनी त्वरित प्रतिसाद देत आमचा कर्जप्राप्तीचा मार्ग आणखी सुलभ करुन दिला. त्याबद्दल आम्ही मोदी सरकार तसेच आमची बॅंक, बॅंक ऑफ इंडिया वाघोली शाखा व बॅंकेचे संपूर्ण व्यवस्थापन यांचे अतिशय आभारी आहोत, अशा शब्दांत शिंदे चौपाटीच्या मालक प्रतिमा शिंदे यांनी आपली भावना व्यक्त केली.

अमृत फूडकार्ड विषयीची संपूर्ण माहिती www.acohi.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अकोहीच्या अमृत फूडकार्डच्या व्यवस्थापनाशी inquiries.asia-division@acohi.org या ईमेल वर किंवा 9823270555 या व्हॉटस्अप क्रमांकावर संपर्क साधता येईल.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *