बिटरगाव श्री येथे चोरी; सोने व रोख रक्कम लंपास

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव श्री येथे आज (सोमवारी) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास चोरी झाली आहे. सीना नदीवरील तरटगाव बंधाऱ्याजवळ विठ्ठल माने यांच्या घरात ही चोरी झाली आहे. अर्धा तोळे सोन्याचे दागिने व रोख १० हजार असा ऐवज चोरटयांनी लंपास केला आहे, असे सांगितले जात आहे. माने हे घराजवळ शेळ्या चारत होते. तर त्यांच्या पत्नी घराजवळ मशीन तोंडलेल्या ऊसाच्या शेतात कांड्या गोळा करत होत्या. दरम्यान माने हे घराकडे आले तेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात पाहिले तर कपाटातील सोन्याचे अर्धा तोळ्याचे दागिने व रोख 10 हजार चोरीला गेल्याचे दिसले. दरम्यान शेजारील रस्त्याने दोन अनोळखी व्यक्ती मोटार सायकलवर गेल्याचे काहीनी पाहिले आहे, असे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *