Vangi Here Acknowledgment of directors of Shri Makai Cooperative Sugar Factory and workers meeting

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा बागल गट भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. २७ तारखेला मुंबई येथे हा प्रवेश होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व दिग्विजय बागल यांना याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी फोन उचलले नाहीत.

मकाई व आदिनाथ कारखान्यामुळे बागल गट अडचणीत आहे. मकाई साखर कारखान्याची ऊसबिले थकलेली आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बागल गट भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा चौकाचौकात सुरु आहे. मात्र नेमके बागल गट काय करणार आहे हे अधिकृतरीत्या समजू शकलेले नाही. बागल गटाने भाजपात प्रवेश करावा, अशी बागल गटातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे, मात्र नेते काय निर्णय घेतली, तोपर्यंत आम्ही प्रतिक्रिया देणार नाही, असे ते सांगत आहेत. मुंबईत बागल गट प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र यावेळी कोण उपस्थित असणार, प्रवेश कसा असणार याचा काहीही तपशील समजू शकलेला नाही.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *