करमाळा (सोलापूर) : वरकाटणे येथील भैरवनाथ मंदिरात मुंबई पोलिसमध्ये भरती झाल्याबद्दल संकेत तनपुरे, अभिषेक तनपुरे व साहिल शेख (रा. उमरड) यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, नायब तहसीदार बाबासाहेब गायकवाड, माजी सरपंच गोकुळ तनपुरे, बापू तनपुरे, ऍड. जयदीप देवकर, बिभीषण देवकर, ग्रामसेवक अंगद माने, प्रा. बिभीषण मस्कर, सोसायटीचे चेअरमन शरद देवकर, मकाईचे संचालक सचिन पिसाळ, मछिंद्र देवकर, तानाजी तनपुरे, रवींद्र तनपुरे, भैरवनाथ तनपुरे, अजीज शेख आदी उपस्थित होते.
वरकाटणेत मुंबई पोलिसमध्ये निवड झालेल्या तिघांचा सत्कार
