करमाळ्यातून पाच दिवसात तीन महिला बेपत्ता

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातून पाच दिवसात तीन महिला बेपत्ता झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत करमाळा पोलिसात मिसींग नोंद झाली आहे. बेपत्ता झालेल्या महिलांमध्ये एक ३० वर्षांची, एक ३६ तर एक १९ वर्षांची तरुणी आहे. सोलापूर जिल्ह्यात जूनमध्ये १०८ व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. त्यात ३४ पुरुष आहेत. तर ७४ महिला आहेत.

करमाळा तालुक्यात मे महिन्यात ९ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यात सहा महिलांचा समावेश असून त्यात एका ८० वर्षाच्या वृद्ध महिला आहे. एप्रिलमध्ये ६ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यात ३ पुरुष होते. तर दोन मुलींचा समावेश होता. मार्चमध्ये ११ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यात ८ मुलींचा समावेश होता. त्या २५ वर्षाच्या आतील होत्या. फेब्रुवारीत ५ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यात दोन तरुणी व तीन पुरुषांचा समावेश होता. जानेवारीमध्ये ९ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यात चार महिलांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *