करमाळा : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा यांच्या वतीने करमाळा शहरातून ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अभियानांतर्गत ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाच्या निमित्ताने आज (सोमवारी) विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत भव्य रॅली काढली. आझादी का अमृत महोत्सव अभियानांतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयांमध्ये सकाळी ८.१५ वा. संस्थेचे अध्यक्ष मिलिंद फंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी घोषणा देत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य लेफ्ट. संभाजी किर्दाक उपस्थित होते.
By kaysangtaa.21
पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४