पक्षांतर्गत त्रासाला कंटाळून करमाळ्यात शिवसेना महिला पदाधिकाऱ्याचा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय

करमाळा (सोलापूर) : करमाळ्यात शिवसेनेच्या (शिंदे गट) ओबीसी विभागाच्या जिल्हा प्रमुख पद्यमजा इंगवले यांनी पक्षाअंतर्गत त्रासाला कंटाळून राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्या माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून लवकरच महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले आहे. याबाबत जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्याशी संपर्क साधला मात्र संवाद झालेला नाही.

इंगवले यांचा चिवटे यांच्यावर पक्षात सन्मानपूर्वक वागणूक दिली नसल्याचा आरोप आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींना प्रोत्साहन देतात. मात्र पक्षातील पदाधिकारी महिलांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नसल्याचा आरोप केला आहे. याबाबत पक्षातील वरिष्ठांशी तक्रार केल्यानंतरही त्यांनी तुमच्या पातळीवर निर्णय घ्या, असे सांगितले असल्याचे इंगवले यांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपासून मी शिवसेनेत काम करत आहे. मात्र पक्षात सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही. उपमुख्यमंत्री शिंदे हे महिलांना सन्मान देतात. मात्र पदाधिकारी सन्मान देत नाहीत, असेही त्या म्हणाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *