करमाळा (अशोक मुरूमकर) : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे करमाळा उपकार्यकारी अधिकारी सुमित जाधव यांची बदली झाली आहे. जाधव यांच्या बदलीची माहिती समजताच करमाळकर भाऊक झाले. एक कर्तबगार अधिकारी म्हणून जाधव यांची ओळखी निर्माण झाली होती. चार वर्षाच्या कालावधीत त्यांनी सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना न्याय दिला. त्यामुळे शेतकरी संघटना व करमाळ्यातील सर्व राजकीय गटातील प्रमुखांमध्येही एक चांगले अधिकारी अशी त्यांची प्रतिमा झाली होती.
जाधव हे २०१९ मध्ये करमाळा येथे उपकार्यकारी अधिकारी म्हणून आले होते. थेट परीक्षेतून त्यांची नियुक्ती झाली होती. सर्वसामान्य कुटुंबातून आल्याने त्यांना शेतकरी आणि आणि नागरिकांच्या प्रश्नाची जाण होती. त्यामुळे त्यांच्याकडे गेलेल्या नागरिकांना न्याय मिळत होता. वीज बिल वसुलीतही त्यांनी केलेली वसुलीही उल्लेखनीय होती. त्यामुळे त्यांचे नाव वरिष्ठही घेत होते. ‘जाधव हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत’, असा उल्लेख एखादा शासकीय विश्रामगृह येथे अतुल खूपसे यांनी पत्रकारांशी बोलताना केला होता.
सरकारच्या आदेशाने वीज बिल वसुली करताना जाधव हे सर्वांशी समन्व्य ठेवून होते. शेतकरी संघटना, राजकीय नेते व शेतकरी यांना विश्वासात घेत होते. त्यामुळे त्यांना शेतकरीही वीज बिल भरण्यास सहकार्य करत होते. ‘राजकीय हस्तक्षेप न झाल्याने व वसूलीच्या बाबतीत शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे काम करता आले. आठ तास वीज देण्याचा नेहमी प्रयत्न केला’, असे जाधव नेहमी म्हणत होते. त्यांची बदली शिरुर येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून झाली आहे. त्यांच्याजागेवर अकोला येथील अशिष कलावटे यांची नियुक्ती झाली आहे.
जाधव हे करमाळा येथे २०१९ पासून आले होते. करमाळा येथे येण्यापूर्वी ते सोलापूर शहर येथे कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी अकलूज, बीड व सौताडा येथे काम पाहिले होते. त्यांची नियुक्ती स्पर्धा परीक्षेतून झालेली आहे. सौताडा येथे त्यांनी सुरुवातीला पदभार स्वीकारला होता. त्यांच्या बदलीची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीसहायक डॉ. विकास वीर, दत्ता अडसूळ, सुभाष अंभग, अच्युत कामटे, तुषार शिंदे आदींनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहे.