करमाळा (सोलापूर) : येथे शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
चिवटे म्हणाले, शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एक चमकणारे रत्न होते. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देशभरातील राजकारणात आदराने घेतले जाते. ते केवळ नावाने नव्हे तर कृतीने हिंदू हृदयसम्राट होते. त्यामुळे त्यांची कीर्ती भारतात आणि भारताबाहेरही होती. त्यांचा जन्म एका सामान्य महाराष्ट्रीय कुटुंबात झाला. त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढा दिला.
तालुकाप्रमुख अनिल पाटील, राहुल कानगुडे, तालुका उपप्रमुख बाळासाहेब वाघ, युवासेना तालुकाप्रमुख चंद्रकांत राखुंडे, दिनेश घोलप, रामचंद्र पाटील, सिद्धेश्वर दास, वैद्यकीय सहाय्यक नागेश चेंडगे, हिवरवाडीचे माजी संरपंच राजेंद्र मेरगळ, अशोक चव्हाण, रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण आदी उपस्थित होते.