Two crore sanctioned for conservation of Bhuikot fort in Karmala

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाअंतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येणार आहे. यासाठी दोन कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.

आमदार शिंदे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा व माढा या तालुक्यांबरोबरच धाराशीव जिल्ह्यातील परांडा, भूम आदी भागावर राजे रावरंभा निंबाळकर यांची सत्ता होती. करमाळ्यातील कमलादेवीचे मंदिर व भुईकोट किल्ला हा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. करमाळा हे तालुक्याचे ठिकाण असून त्यास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ऐतिहासिक वारसाचे जतन व संवर्धन करणे हे आपले काम आहे. त्यानुसार करमाळा तालुक्यातील कमलाभवानी मंदिराच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून चार कोटी निधी मंजूर केला. त्याचप्रमाणे भुईकोट किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी दोन कोटी निधी मंजूर केला आहे.

किल्ल्याची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे मुख्य दरवाजा, किल्ल्याचे बुरुज दुरुस्ती, तटबंदीचे काम, किल्ल्याबाहेरील परिसर सुशोभीकरण करणे या प्रकारच्या बांधकामाचा सामावेश आहे. किल्ल्याच्या कामासाठी निधीस मंजुरी मिळाली असल्याने लवकरच या कामास सुरुवात करण्यात येईल, तसेच या कामामुळे किल्ल्यास पुर्नवैभव लाभणार असून करमाळा शहाराच्या विकासात आणखीन भर पडण्यास मदत होणार आहे.

करमाळा शहराच्या सौंदर्यात भर पडणेसाठी करमाळा नगरपालिका इमारत बांधकाम करणे, सांस्कृतिक सभागृह बांधणे, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणे या कामासाठी १० कोटी निधी, जिन मैदान येथील क्रीडा संकुल विकासासाठी ६ कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील रस्ते विकास, दफनभूमी सुधारणा आदी कामांसाठी १० कोटी, करमाळा उपजिल्हा रुग्णालय बांधकामासाठी २५ कोटी, उपजिल्हा रुग्णालय अधिकारी व कर्मचारी वसाहतीसाठी १८ कोटी, सहकारी संस्था निबंधक कार्यालयासाठी २ कोटी, करमाळा शहरातील प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील रस्ते विकासासाठी १ कोटी निधी मंजूर केलेला आहे. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्न केले व त्याला यशही मिळाले आहे. करमाळा शहरातील सर्व प्रशासकीय इमारती एका ठिकाणी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीकरता २५ कोटी निधीची मागणी केलेली आहे, असे आमदार शिंदे यांनी सांगितले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *