करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आळजापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय रोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड होताच आळजापूरमध्ये नागरिकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. यामध्ये ही निवड झाली आहे. या निवडीनंतर बिभीषण खरात, शशिकांत घोडके, ऍड. नितीन गपाट, डॉ. हरिदास केवारे आदींनी जल्लोष केला.
