करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कामोणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अश्विनी नलवडे यांची निवड झाली आहे. यावेळी सरपंच रमेश खरात यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, संजय भिसे, सुहास जाधव, सारिका शिंदे, रुपाली नलवडे, शोभा भालेराव ग्रामस्थ, नाना नलवडे, प्रदीप पाटील, नवनाथ भालेराव, बबन भालेराव, औदुंबर नलवडे, महारुद्र जाधव, लक्ष्मण भालेराव, पंकज नलवडे आदी उपस्थित होते.

