करमाळा (सोलापूर) : करमाळा तहसील कार्यालय येथे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आज (शुक्रवारी) सकाळी शासकीय ध्वजारोहण केले. यावेळी पोलिस निरीक्षक विनोद घुगे, नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, महसुलाचे नायब तहसीलदार काझी, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार दादासाहेब गायकवाड, गटविकास अधिकारी देवा सारंगकर यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
करमाळा तहसील कार्यालय येथे झालेल्या शासकीय ध्वजारोहणप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, सुमंतभद्रा बाल विद्यालय, नोबल इंग्लिश विद्यालय, नगरपालिका मुलींची शाळा नंबर एक येथील विद्यार्थ्यांनी कला सादर केली. सुरुवातीला यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व महात्मा गांधी विद्यालयच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. त्यानंतर उपस्थितांना कुष्ठरोगमुक्त भारतची शपथ देण्यात आली. यावेळी उपस्थित देशसेवा केलेल्या सैनिकांचा व त्यांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, नरसिंह चिवटे, संगीता कांबळे आदींचा सन्मान झाला.