राष्ट्रवादीच्या कार्यालयाला आमदार शिंदे समर्थकांची भेट, ‘डीपीसी’च्या निवडीबद्दल अॅड. सावंतांचा सन्मान

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादी कार्यालयाला आमदार संजयमामा समर्थकांनी आज (मंगळवारी) भेट दिली. सोलापुरात जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे यांनी राष्ट्रवादीचे कार्यालय सुरु केले आहे. याचे लवकरच उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यालयाचे उद्घघाटन झाल्यानंतर रंगभवन येथे अॅड. सावंत यांचा सावंत यांचा सत्कार झाला.

सोलापुरात सुरु होणार्या राष्ट्रवादी कार्यालयात आज सत्यनारायण पूजा झाली. त्यानंतर रंगभवन येथे कार्यकर्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल अॅड. सावंत यांचा माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष साळुंखे, अभिषेक आव्हाड आदी मंचावर होते.

यावेळी शिंदे गटाचे समर्थक सुजित बागल, अॅड. राहुल सावंत, भारत आवताडे, दिनेश घोलप, अश्पाक जमादार, सुरज ढेरे, तुशार शिंदे, दादासाहेब जाधव, किरण फुंदे, डॉ. सुभाष शेंद्रे, अभिषेक आव्हाड, मानसिंग खंडागळे, राजेंद्र पवार, भोजराज सुरवसे, दत्तात्रय अडसुळ, देविदास वाघ, शितल क्षीरसागर, नंदीनी लुंगारे, स्नेहल अवचर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *