Voter Brief Review Program

सोलापूर : मतदार संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील २४८- सोलापूर शहर उत्तर व २४९- सोलापूर शहर मध्य मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर २५ व २६ नोव्हेंबर २०२३ या दिवशी विशेष शिबीर होणार आहे. यावेळी मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहणार आहेत. नागरीकांनी मतदार नोंदणी, दुरुस्ती व वगळणीचे अर्ज भरुन मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे द्यावेत, असे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

मतदार नोंदणीसाठी नमुना ६ भरणेसाठी आवश्यक कागदपत्राचा तपशील खालील प्रमाणे आहे १) मतदाराचा पासपोर्ट आकारातील फोटो (फोटोच्या मागील बाजुस व्हाईट बॅकग्राऊड असावे) २) मतदाराचे जन्म तारखेचा पुरावा यामध्ये खालील पैकी एक कागदपत्र आवश्यक आहे. (1) जन्म दाखला (२) आधारकार्ड (३) पॅन कार्ड (४) ड्रायव्हिंग लायसन्स (५) पासपोर्ट (६) १० वी १२ बोर्ड सर्टीफिकेट ज्यावर जन्म तारीख नमूद असावी. (७) जन्म तारीख नमूद असलेला अन्य कोणताही पुरावा. ३) रहिवासाचा पुरावा यामध्ये खालील पैकी एक कागदपत्र आवश्यक आहे. (१) बॅक / किसान/ पोस्ट ऑफिस करंट पासबुक (२) रेशन कार्ड (३) पासपोर्ट (४) ड्रायव्हिंग लायसन्स (५) इनकम टॅक्स असेसमेंट ऑर्डर (६) भाडे करारनामा (७) पाणी / दूरघ्वनी/ लाईट / गॅस कनेक्शन बिल (८) अर्जदाराचे नांवे पोस्ट विभागामार्फत पोहोच झालेले कोणतेही पत्ता नमूद केलेले कागदपत्र

मयत, स्थलांतरीत मतदारांचे वगळणीसाठी त्यांनी अथवा त्यांचे रक्‍तसंबंधातील नातेवाईकांनी नमुना -७ चे अर्ज भरुन सादर करावेत. तसेच मतदार यादीतील दुरुस्तीसाठी नमुना – ८ मधील अर्ज व ज्या बाबीची दुरुस्ती करावयाची आहे त्या संबंधित कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.

नागरीकांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून विशेष शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन सदाशिव पडदुणे उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र १ व श्री सैपन नदाफ, तहसिलदार उत्तर सोलापूर यांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *