करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या नऊ जागांसाठी आज (शुक्रवारी) मतदान घेतले जात आहे. ४१ मतदान केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया सुरु आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप तिजोरे व प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव हे काम पाहत आहेत. सर्व मतदान केंद्रावर अतिशय संथगतीने व शांततेत मतदान सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वाशिंबे, पारेवाडी, उंदरगाव भागातील मतदान केंद्रांना भेटी देऊन पहाणी केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मतदान करताना आदिनाथचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे.

सर्वांचे लक्ष लागलेल्या मकाई साखर कारखान्याची १७ जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र बागल विरोधी गटाचे ऊस गाळपाचे नियमात अर्ज अपात्र ठरल्याने बागल गटाच्या आठ जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे नऊ जागांसाठी निवडणूक लागली. यामध्ये १४ उमेदवार रिंगणात आहेत. ४१ मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया सुरु आहे. सकाळी साडेअकरा पर्यंत सर्वत्र मिळालेल्या माहितीनुसार संथ गतीने मतदान सुरु आहे.

मतदान करताना शिंदे गटाचे समर्थक वामराव बदे.

यामध्ये हिवरे मतदान के केंद्रावर १८०, पोथरे मतदान केंद्रावर १६४, चिखलठाण येथे दोन मतदान केंद्र आहेत. त्यातील एकावर ८० तर दुसऱ्यावर ७० मतदान झाले आहे. रावगाव मतदान केंद्रावर ११६ मतदान झाले आहे. येथील बहुतांश मतदार हे बाहेरगावी आहेत. ते आल्यानंतर मतदान वाढेल असे सांगितले जात आहे.

मतदान करताना माजी सभापती भाग्यश्री शिंदे.

पोथरे मतदान केंद्रावर पंचायत समितीच्या माजी सभापती भाग्यश्री शिंदे यांनी मतदान केले आहे. तर आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष धंनजय डोंगरे यांनी चिखलठाण येथे मतदान केले आहे. वाशिंबे येथील मतदान केंद्रावर आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक सरपंच तानाजी झोळ, माजी आमदार नारायण पाटील गटाचे समर्थक नवनाथ झोळ, मकाई बचाव समितीचे प्रा. रामदास झोळ, बागल गटाचे समर्थक गणेश झोळ यांनी मतदान केले आहे.

हिवरेत मतपेटीचे पूजन करताना उपस्थित सतीश नीळ.

हिवरे मतदान केंद्रावर बिनविरोध झालेले सतीश नीळ यांच्या उपस्थितीत मतपेट्यांचे पूजन करून मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. मांगी ऊस उत्पादक गटातील उमेदवार सुभाष शिंदे यांनी त्यांच्या गटातील पोथरेसह इतर मतदान केंद्रावर भेटी दिल्या आहेत. येथे मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी म्हणून दोन्ही गटाचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

पोथरे येथे मतदान प्रकियेवेळी मतदारांना मदत करण्यासाठी थांबलेले कार्यकर्ते.

मतदारांना मदत करण्यासाठी शिंदे गटाचे समर्थक शहाजी झिंजाडे यांच्यासह हरिभाऊ झिंजाडे, गोपाळ झिंजाडे, बबनराव मुरूमकर, रेवण मुरूमकर हे मदत करत आहेत. याशिवाय आदिनाथचे माजी संचालक प्रकाश पाटील, माजी सरपंच हरिश्चंद्र झिंजाडे, सरपंच धंनजय झिंजाडे, किसन झिंजाडे, नारायण भांड, चंद्रकांत शिंदे, दिगंबर झिंजाडे, झुंबर कडू व विठ्ठल खटके आदी प्रयत्न करत आहेत. पोलिस पाटील संदीप पाटील हे देखील येथे उपस्थित आहेत.
(एकूण आकडेवारी घेण्याचे काम सुरु असून आकडेवारी आल्याबरोबर दिली जाईल.)

पोथरे येथे मतदान प्रकियेवेळी मतदारांना मदत करण्यासाठी थांबलेले कार्यकर्ते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *