करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वांगी 3 येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून धनंजय रोकडे तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण गोडसे यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून सुप्रिया तळेकर, विद्या खराडे, जयवंत सातव, यशवंत भवर, प्रणिता मेनकुदळे, अनिता शिंदे, नागनाथ वाघमोडे, प्रकाश तेलंग. ज्योती कांबळे, शिक्षक तज्ञ मारुती रोकडे तर ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून रतन सातव, शिक्षक प्रतिनिधी म्हणून जालिंदर कणसे तर सचिव म्हणून आदिनाथ राऊत यांची निवड झाली आहे. या निवडीवेळी सरपंच मयूर रोकडे उपस्थित होते.
