करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जगताप, पाटील, बागल गटामध्ये समझोता झाल्यानंतर आज (सोमवारी) कोण अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्ज मागे घेण्याचा उद्या (मंगळवार) शेवटचा दिवस आहे, त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र बागल, पाटील व जगताप यांच्यात मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागेचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे आता कोणाचे अर्ज राहणार आणि कोण माघार घेणार पहावे लागणार आहे.
जागा वाटपामध्ये जगताप गटाला सहकारी संस्था मतदारसंघातील ११, पाटील गटाला ग्रामपंचायतमधील दोन व बागल गटाला दोन जागा देण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार आता कोणाचे अर्ज राहणार आणि कोणाचे निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे सावंत गटाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची तयारीही सुरु आहे. मात्र याचे चित्र उद्याच स्पष्ट होणार आहे.