करमाळा (सोलापूर) : पंचायत समितीच्या पांडे गणातून माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढविणार आहे, असे बिटरगाव श्री येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण घोडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
घोडके म्हणाले पांडे गण हा अनुसूचित जाती (एसी) सर्वसाधारणसाठी राखीव आहे. या गणातुन शिंदे यांनी उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविणार आहे. या भागात नागरिकांसाठी सामाजिक काम केले आहे. पूरपरस्थीतीवेळी नागरीकांच्या मदतीला धावलो आहे. अनेकांना घरकुल व व्यक्तिगत लाभाच्या योजना मिळवून दिल्या आहेत. संपर्कही चांगला ठेवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत उतरायचे आहे. माजी आमदार शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली आम्ही काम करत आहोत. त्यांनी उमेदवारी दिली तर महायुतीकडून निवडणूक लढविली जाणार आहे.
