1 lakh 3 thousand 500 rupees was stolen by attacking both of them in Salset1 lakh 3 thousand 500 rupees was stolen by attacking both of them in Salset

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सालसे येथे अनोळखी चौघांनी सशस्त्र हल्ला करुन घरातील १ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले आहेत. शनिवारी (ता. ४) पहाटे २ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. यामध्ये मधुकर संतराम आडसुळ (वय ६५, रा. सरकारी विहीरीजवळ, सालसे) यांनी फिर्याद दिली आहे.

घरासमोरील गोठयात गाय ओरडल्याचा आवाज आल्याने अडसूळ यांनी दरवाजा उघडला तेव्हा अचानकपणे अनोळखी चौघांनी घरामध्ये जबरदस्तीने घुसुन फिर्यादीच्या घरातील पेटया व डबे उघडण्यास सुरूवात केली. त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. म्हणुन त्यापैकी एकाने चाकुने वार करुन अडसूळ यांना जखमी केले. त्यापैकी एकाने काठीने मारहाण केली. तेव्हा अडसूळ यांची पत्नी सोडवण्यासाठी आली तेव्हा त्यांनाही मारहान केली.

यामध्ये १५ हजार रोख व १५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, ९ हजाराचे २ गॅमचे मंगळसुत्र, ९ हजाराची सोन्याची फुले, ३ हजाराचे तीन फोन असा १ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढुन घेवुन गेले. याचा पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *