The application deadline for the post of Police Patil in Madha Karmala taluka has been extendedThe application deadline for the post of Police Patil in Madha Karmala taluka has been extended

सोलापूर : उपविभागीय दंडाधिकारी, माढा विभाग कुर्डूवाडी यांचेकडुन 14 सप्टेंबर अन्वये पोलिस पाटील पद सरळ सेवा भरती 2023 चा जाहीरनामा प्रसिध्द करणेत आलेला होता. त्यामध्ये ज्या व्यक्तीस पोलिस पाटील म्हणून काम करणेची इच्छा आहे. त्यांनी आपले अर्ज 18 सप्टेंबर पासुन 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत ( शासकिय सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय माढा विभाग कुईवाडी येथे समक्ष सादर करणेबाबत कळविणेत आले होते.

तथापि जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडील आदेश 27 सप्टेंबर 2023 अन्वये अनंत चुतर्दशीची 28 सप्टेंबर 2023 रोजीची स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे. तसेच 29 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 पर्यंत सलग शासकीय सुट्टी आल्याने, अर्जदारास पुराव्याची कागदपत्रे विहीत मुदतीत जमा करणेस शक्य होणार नाही, ही बाब निदर्शनास आली आहे.

तरी उमेदवारास अर्ज करणेची मुदत वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे सुधारित जाहिरनामा प्रसिध्द करून, त्याद्वारे माढा उपविभागातील माढा व करमाळा तालुक्यातील पोलिस पाटील भरतीमधील गावातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, त्यांनी 5 ऑक्टोबरपर्यंत (शासकिय सट्टीचे दिवस वगळून) उपविभागीय दंडाधिकारी माढा विभाग कुर्डुवाडी यांचे कार्यालयात समक्ष सादर करावेत. या मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलिस पाटील निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी माढा प्रियंका आंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाने कळविले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *