सरडे यांच्या वाढिवसानिमित्त उद्या इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन

करमाळा (सोलापूर) : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत सरडे यांच्या वाढिवसानिमित्त चिखलठाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार व समाजप्रबोधनकार हभप निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदुरीकर यांचे बुधवारी (ता. १५) रात्री ९ ते ११ यावेळेत कीर्तन होणार आहे. चंद्रकांतकाका सरडे युवा मंच, अष्टविनायक गणेश तरुण मंडळ व समस्थ ग्रामस्थ यांच्या वतीने हा कीर्तनसोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी माजी आमदार संजयमामा शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. सरडे हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्या गटात आरक्षणही सर्वसाधारण पडले आहे. त्यामुळे या वाढदिवसाकडे सर्वांचेच विशेष लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *