करमाळा (अशोक मुरूमकर) : थकीत ऊसबिलासाठी नुकतेच शेतकऱ्यांचे करमाळ्यात आंदोलन केले. यावेळी पुन्हा एखादा शेतकऱ्यांना आश्वासन मिळाले आहे. आता हे आश्वासन पूर्ण होणार का? अशी चर्चा असतानाच मकाई सहकारी साखर कारखान्याने ज्या लेटरपॅडवर आश्वासन दिले आहे. त्यावरून कारखान्याचे नेमके अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरु झाली आहे.
तालुक्यातील मकाई व कमलाई साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या गळीत उसाचे पैसे थकीत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. त्यातूनच पहिल्यांदाच तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. याचे नेतृत्व बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी केले. या आंदोलनावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्याना लेटरपॅडवर लेखी आश्वासन दिले आहे. 12 ते 15 दिवसात बिल अदा करण्याची कार्यवाही करत आहोत, असे यामध्ये म्हटले आहे.
मकाई कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक एच. पी. खाटमोडे व कारखान्याचे अध्यक्ष म्हणून दिनेश भांडवलकर यांच्या स्वाक्षरीने हे 20 तारखेला हे आंदोलन होण्याची आदी म्हणजे 20 तारखेला हे पत्र देण्यात आले होते. पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे व प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव व कदम यांना या पत्राची प्रत देण्यात आली आहे. हे पत्र सध्या चर्चेत आले आहे. या पत्राच्या लेटरपॅडवर अध्यक्ष म्हणून भांडवलकर यांची सही असली तरी वरती उलेख मात्र अध्यक्ष म्हणून दिग्विजय बागल यांचा आहे. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरू झाली आहे.
मकाई कारखान्याची नुकतीच निवडणूक झाली आहे. पुन्हा एखादा हा एक हाती कारखाना बागल गटाच्या ताब्यात गेला आहे. या कारखान्याचे अध्यक्ष म्हणून भांडवलकर यांची निवड झाली आहे. मात्र कारखाना अजूनही जुनीच लेटरपॅड वापरत आहे. लेटरपॅडवर असलेल्या उल्लेखवरून चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान कारखान्याकडून नवीन लेटरपॅड छपाईसाठी देण्यात आली आहेत. जुनी लेटरपॅड शिल्लक आहेत. नवीन लेटरपॅड आलेले नाहीत म्हणून हे लेटरपॅड वापरण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे करखानेचे कार्यकारी संचालक खाटमोडे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.