करमाळा (सोलापूर) : परीक्षेला जाताना रेल्वेतून पडलेल्या विद्यार्थ्यामुळे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टिका केली जात आहे.
परीक्षेला जातान रेल्वेतुन पडून जखमी होणे ही दुर्दैवी घटना असून असे प्रकार घडू नयेत म्हणून मध्य रेल्वेच्या जेऊर रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी दलित सेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष निलावती कांबळे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना केली आहे.
कांबळे म्हणाल्या मध्य रेल्वेच्या मार्गावरील जेऊर हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. मात्र येथे एक्स्प्रेस गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. ज्या गाड्या थांबत आहेत त्यात गर्दी असते त्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना त्याच गाड्यांना जावे लागते. त्यात गर्दीचा सामना करावा लागतो आहे. खासदारांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. करमाळ्याला खासदार आहेत की नाहीत असा प्रश्न त्यांनी निर्माण केला आहे.