Chief Minister Eknath Shinde visited the ongoing MP Cultural Festival in Nagpur city

नागपूर शहरात सुरु असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट दिली आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सवाने देश- विदेशातील नामवंत कलाकार व स्थानिक कलाकारांच्या कलाकृती नागपूरकरांना उपलब्ध करून दिल्या आहेत, ही येथील नागरिकांसाठी मोठी सांस्कृतिक मेजवानी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिपादन केले आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची विकास पुरुष म्हणून ओळख आहे. रस्ते, इमारती व पायाभूत सुविधांच्या निर्मितीसोबतच त्यांच्यातील कलासक्त पुरूष क्रीडा, संगीत, नृत्य आणि विविध कलांच्या माध्यमातून आपली कलासंस्कृती जोपासण्याचे काम करीत असतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला शोभेल, असा हा महोत्सव आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित, खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रवीण दटके, आशिष जायस्वाल उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पीयूष मिश्रा व गीतरामायण नाटिका प्रमुख अरूणा भिडे यांचा सत्कार करण्यात आला.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *