Animal earned Rs 100 crores on its first day

शुक्रवारी (१ डिसेंबर) प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच, चाहते रणबीर आणि बॉबीवर प्रभावित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे या चित्रपटाची क्रेझ स्पष्टपणे दिसून आली.

रणबीरच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. Sacnilk च्या अहवालानुसार ‘ॲनिमल’ने उत्कृष्ट ॲडव्हान्स बुकिंगसह ६१ कोटी रुपयांची ओपनिंग केली आहे. एनसीआरमध्ये या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे. चित्रपटाच्या जगभरातील कमाईबद्दल बोलले जात आहे की, पहिल्याच दिवशी त्याने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ने पहिल्या दिवशी भारतात ५७ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने जगभरात १०४.८० कोटींची कमाई केली होती. सनी देओलच्या ‘गदर २’ ने, पहिल्या दिवशी देशभरात ४०.१ कोटींची कमाई झाली होती. तर शाहरुखच्या मागील ‘जवान’ या चित्रपटाने देशभरात पहिल्याच दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती.

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील रणबीरच्या लूकने सर्वांनाच चकित केले आहे. बॉबी देओल हा देखील या चित्रपटाचे महत्त्वाचे आकर्षण आहे. भारताच्या विविध भागात या चित्रपटाची प्रचंड क्रेझ होती. आंध्र प्रदेशातील कुरनूलमध्ये असलेल्या सिनेमा हॉलमध्ये सकाळी ६ वाजल्यापासूनच चाहत्यांची लांबलचक रांग लागली होती. ‘कबीर सिंग’ आणि ‘अर्जुन रेड्डी’ सारखे चित्रपट बनवणाऱ्या संदीप रेड्डी वंगा यांची दक्षिणेत प्रचंड क्रेझ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *