करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘ऊस बिल जमा करताय का? ‘नाद’ करताय… अन त्योबी शेतकऱ्यांचा अर्रर्रर्र ‘थू’ तुमच्या…’ अशा आशयाचे कर्माल्यातध्या बॅनर झळकले आहेत.त्यावर पंचायत समितीचे माजी सदस्य ऍड. राहुल सावंत, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे व दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ यांचे फोटो आहेत. सध्या हे बॅनर चर्चेचा विषय झाले आहेत. (The banner of the protest against the Makai cooperative sugar mill in Karmala city)
ऊस वाहतूकदारांसाठी युवासेनेचे फडतरे यांचा करमाळा प्रशासनाला इशारा
बागल गटाच्या ताब्यात असलेल्या श्री मकाई सहकारी साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या ऊस बिलासाठी सुरु असलेल्या आंदोलनात सावंत गटाचे नेते पंचायत समितीचे माजी सदस्य ऍड. राहुल सावंत हेही उतरले आहेत. ‘बोबाबोब’ आंदोलनानंतर आता शुक्रवारी (ता. ८) ‘थू- थू’ आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने करमाळा शहरात बॅनरबाजी करण्यात आली असून त्यावर सावंत यांच्यासह शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे व प्रा. रामदास झोळ यांचे फोटो आहेत.
मकाई सहकारी साखर कारखाना बागल गटाच्या ताब्यात आहे. हा कारखाना यावर्षी बंद असून गेल्यावर्षीचे शेतकऱ्यांचे ऊस बील देणे बाकी आहे. हे बील मिळावे म्हणून गेल्या आंदोलनात तरटगाव येथील शेतकरी हरिदास मोरे यांनी अधिकाऱ्यांसमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अद्यापही बिल मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने संचालक मंडळावर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे.
आदिनाथ कारखान्यावर लावलेले सावंत यांचे फोटो काढा : सुभाष गुळवे
मकाई कारखान्याकडे शेतकऱ्यांकडे पैसे असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. या कारखान्याची काही दिवसांपूर्वीच निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत प्रा. झोळ यांनी उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्यासह सहकाऱ्यांचे अर्ज नामंजूर झाल्याने पॅनल देता आला नव्हता. या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे व त्यांचे सहकारी प्रा. झोळ यांच्याबरोबर होते. मात्र तरीही सभासदांनी त्यांना नाकारले होते. निवडणुकीत त्यांचा पूर्ण पॅनल तर नव्हताच शिवाय जे उमेदवार होते. त्यांचाही पराभव झाला. बागल गटाच्या एक हाती हा कारखाना ताब्यात गेला होता. त्यानंतर नवीन संचालक मंडळाकडून शेतकऱ्यांचे पैसे मिळतील अशी अशा होती. मात्र अजूनही संचालक मंडळाला व सत्ताधारी बागल गटाच्या प्रमुखांना बँकेकडून कर्ज मिळू शकलेले नाही. ते कर्ज मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. प्रशासनाकडूनही शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्याच्या दृष्टीने कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.
गुड न्यूज! अंबालिका साखर कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर
शेतकऱ्यांना त्वरित पैसे मिळावेत यासाठी आंदोलनकर्त्याकडूनही दबाव आणण्याचे काम सुरु आहे. बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनीही यासाठी आंदोलने केली होती. आता सावंतही या आंदोलनात उतरले आहेत. या आंदोलनात जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे म्हणून आवाहन केले जात असून त्यासाठी आता बॅनरबाजी केली जात आहे.
शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यासाठी ‘मकाई’पुढे ‘हे’ आहेत पर्याय?