Netizens targeted BJP MP Nimbalkar on social media

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या इच्छुकांचे मतदारसंघात दौरे वाढले आहेत. त्यात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आघाडीवर आहेत. मात्र करमाळा विधानसभा मतदार संघात सोशल मीडियावर ते सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांनी केलेल्या मागणीची पूर्तता झाली नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याची चर्चा सुरु झाली आहे.

करमाळा तालुक्यातून मध्य रेल्वेचा चेन्नई- मुंबई मार्ग जातो. या मार्गावरील रेल्वेबाबत अनेक समस्या आहेत. भाजपचे अमोल जरांडे यांनी खासदार रणजतसिंह नाईक निंबाळकर यांची पारेवाडी रेल्वे स्टेशनजवळील बोगद्यातील रस्ताच्या कामासंदर्भात भेट घेतली होती. त्यावर नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. त्यानंतर ऍड अजित विघ्ने यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला. काहींनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय करण्याची मागणी केली. आंदोलन करण्याची चर्चा सुरु असतानाच नेटकरी रवी विघ्ने म्हणाले, ‘खासदार निंबाळकर यांनी पारेवाडी रेल्वे स्थानकवार एक्सप्रेस गाडीला थांबा देण्याचे काम असो किंवा बोगद्याचे काम असो नेहमीच चर्चा, बोळवण करून येथील सर्वसामान्य नागरिकांना सापत्नभावाची वागणूक दिली आहे. त्यामुळे सर्वांनी येत्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घालून आंदोलनाचे तीव्र हत्यार उपसावे म्हणजेच, प्रशासनाला जाग येईल.’

त्यावर ऍड. विघ्ने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, ‘खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपण सर्वजण अनेक वेळा भेटलो आहे. तब्बल 31 वेळा त्याचे पुरावे आहेत. तरीही अद्याप काम झाले नाही. त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पत्रही दिले आहे. परंतु आपल्या पारेवाडी स्टेशनवरील प्रवाशांचे होणारे हाल व मागणी लावुन धरली पाहिजे व काम झाले पाहीजे. एवढीच अपेक्षा. 1996 पासून आम्ही प्रयत्न करतो आहोत. रेल्वेला थांबा नाही. बोगदयाचे निकृष्ट काम त्यामुळे ही कामे झाली नाहीत तर भाजपा विरोधी उमेदवाराला मतदान होईल. बहिष्कार टाकुन काही होत नसते. आपण मिटींग घेऊन सविस्तर प्लॅन ठरवु . शक्यतो रविवारी मिटींग होईल.

एका संतप्त नेटकऱ्याने खासदार निंबाळकर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपने आश्वासन आणि फसवणूक केली आहे. मतदानावर बहिष्कार हाच मार्ग चांगला असल्याचे म्हटले आहे. त्यावर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे की, ‘दहा वर्ष भाजप देशात सत्तेत आहे. किती अपेक्षा कराल अजून भाजपकडून. तुम्हाला बहिष्कार टाकायचा असेल तर मतदानावर बहिष्कार टाका. विकास कामाचे बागायचे असेल तर रोड, रेल्वे यांच्यासारखी क्रांती भाजपा सारखी कोणच करू शकत नाही. उदाहरण आपल्या स्टेशन वरच घ्या. त्यावर उदय पाटील यांनी म्हटले आहे की, ‘नुसती स्टेशन नटवली आहेत सगळी, गाडी थांबणे महत्वाचे आहे. त्यासाठी लढा उभा करा.’

यावर एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, ‘भाजपाने काय अपेक्षित कामे केली ते सांगा? काय केले स्टेशनवर नव्याने. दादर केले, प्लॉटफॉर्म केले, वीज केंद्र उभारले, गेट बंद करुन नवीन बोगद्याची कामे निकृष्ट करुन सर्वसामान्य जनतेच्या सार्वजनिक रहदारीस अडथळा आणला तसेच दोन्ही बाजूचे प्लॉटफॉर्म रिकामे असतानाही प्रवासी गाडी मधल्या लाईनवर थांबवून अबालवृद्घ, लहानमुले यांना साधे स्टेशनवर उतरतासुद्धा येत नाही. हा विकास आहे का? काय फायदा याचा आम आदमीला.’ आणखी एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, ‘लय भारी स्टेशन बांधल मनून कोणी तिथं मुक्काम केला का आजपर्यत?’

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *