सोलापूर : महायुती सरकरमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच सोलापूर दौर्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणार्या कार्यकर्त्या मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्ते आले असल्याने सभागृह भरले आहे.
राष्ट्रवादीमध्ये अजित पवार व शरद पवार यांचे दोन गट पडले आहेत. अजित पवार हे भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. या महायुती सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. महायुती सरकारध्ये त्यांनी सहभाग घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते सोलापूर दौर्यावर आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील अपक्ष आमदार संजयमामा शिंदे हे सुरुवातीपासून त्यांना नेते मानतात. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे व मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्यासह माजी आमदार राजन पाटील, सांगोल्याचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे उपमुख्यमंत्री पवार यांच्याबरोबर आहेत. सोलापूर शहरासह जिल्यातील करमाळा, माढा, मोहोळ, सांगोला, माळशिरस येथील हजारो कार्यकर्ते ‘राष्ट्रवादी काँग्रस पार्टी कार्यकर्ता मेळाव्या’ला आले आहेत.