करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात काही दिवसापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय सावंत, पाणीपुरवठा अधिकारी फिरोज शेख, फारुक जमादार, मार्तंड सुरवसे, राजेंद्र वीर, पांडुरंग सावंत, यांनी दहिगाव पंपिंग स्टेशनची पहाणी केली आहे.
उजनी धरणातील पाणी खाली गेल्यामुळे तसेच दुबार पंपिंग करून पाणीपुरवठा सुरु असून यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. यामध्ये विद्युत पुरवठा पूर्ण दाबाने होत नसून तसेच दुपार पंपिंग करणारे मोटारीला उजनी धरणातील जाळ्या येऊन अडकत असल्यामुळे दुबार पंपिंग करणारे मोटारी बंद पडत आहे. त्यामुळे करमाळा शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. या ठिकाणी कायम कर्मचारी नसल्यामुळे संपूर्ण जबाबदारी ठेकेदाराकडून पुरवण्यात येणाऱ्या मजुरांकडे आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी भरावा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.