In Karmala Constituency less than 30 polling in eight polling stations

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात माढा लोकसभेसाठी १ लाख ७७ हजार ६५३ मतदान झाले आहे. यामध्ये १ लाख ३४४ पुरुषांनी तर ७७ हजार १६८ महिलांनी मतदान केले आहे. याशिवाय ४ ट्रान्स जेंडरनी (तृतीयपंथी) मतदानाचा हक्क बजवाला आहे. या मतदासंघात आठ मतदान केंद्रावर ३० पेक्षा कमी मतदान झाले आहे. यातील एक मतदान केंद्र हे कुष्ठरोग्यांसाठी होते तर सहा मतदान केंद्रावर मतदारांनी पाणी प्रश्नासाठी मतपेटीतून सरकारवर नाराजी दाखवली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात करमाळा, सांगली, माढा, माळशिरस, माण व फलठण हे मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी १९ लाख ९१ हजार ४५४ मतदार होते. त्यातील १२ लाख ६७ हजार ५३० मतदान झाले आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघात माढा तालुक्यातील ३६ गावांचा समावेश आहे. या मतदारसंघात ३४२ मतदान केंद्र आहेत.

करमाळा तालुक्यातील केडगाव येथील मतदान केंद्र क्रमांक १२४ मध्ये फक्त ८ मतदारांनी हक्क बजावला आहे. येथे एकूण २६ मतदान होते. या गावात तीन मतदान केंद्र होती. माढा तालुक्यातील कुरुडुमध्ये (करमाळा विधानसभा मतदारसंघ) सात मतदान केंद्र आहेत. त्यापैकी पहिल्या मतदान केंद्रावर १२३८ मतदान होते. त्यापैकी फक्त २३ मतदान झाले आहे. दुसऱ्या मतदान केंद्रावर १२४१ मतदान आहे. त्यापैकी फक्त १५ मतदान झाले आहे. तिसऱ्या मतदान केंद्रावर १३४१ मतदान आहे. त्यापैकी ६ मतदान झाले आहे. चौथ्या मतदान केंद्रावर १११९ मतदान आहे. त्यापैकी ११ मतदान झाले आहे. पाचव्या मतदान केंद्रावर ९७६ मतदान आहे. त्यापैकी फक्त ५ मतदान झाले आहे. सहाव्या मतदान केंद्रावर ९२० मतदान आहे. त्यापैकी फक्त ८ मतदान झाले आहे. सातव्या मतदान केंद्रावर ९३६ मतदान आहे. त्यापैकी २१ मतदान झाले आहे.

कुरुडु येथे पाणी प्रश्नावरून नागरिकांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. ही नाराजी दूर करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले मात्र त्याला यश मिळाले नसल्याचे मतदानानंतर दिसले आहे. करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसासिंचन योजनेवरून ४० गावांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी महत्वाची ठरली होती. या प्रश्नाप्रकरणी या भागातील नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेतली होती. चिखलठाण परिसरातील रस्त्याबाबतही नागरिकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची मध्यस्थी यशस्वी झाली.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *