करमाळा (सोलापूर) : येथील गुरुकुल पब्लिक स्कूलच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. बुधवार (ता. 21) योग शिबिराचे संस्थापक अध्यक्ष व सर्व शिक्षक यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.
यावेळी गुरुकुल पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष नितीन भोगे म्हणाले, आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस हा आरोग्यापासून लांब होत चालला आहे. कोरोना सारख्या महामारीने आपल्याला चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे एवढे तर नक्की झाले आहे की जर आपले शरीर निरोगी असेल तरच आपण आयुष्यातील सर्व गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. त्यासाठी आपले शरीर निरोगी असणे महत्त्वाचे आहे.
या योगामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक बदल घडतात, शारीरिक दृष्ट्या विद्यार्थी व गरिकांनी दररोज योग करून आपले शिरिर जपावे, असे नितीन भोगे सर यांनी सांगितले. यावेळी गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी पासून ते इयत्ता बारावी पर्यंत असणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व शिक्षिका यांनी या शिबिराचे आपल्या शाळेतील सर्व शिक्षक वर्ग यांनी विद्यार्थ्यांनबरोबर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.