करमाळा (सोलापूर) : कामगार नेते सुभाष आण्णा सावंत यांनी आजन्म कष्टकरी, गोरगरीबासाठी संघर्ष रुपी साधना केली. अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांचा वारसा ॲड. राहुल सावंत व सावंत कुटुंबीयांकडून पुढे चालू आहे, प्रतिपादन हभप पांडुरंग महाराज उगले यांनी केले. कामगार नेते स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी तरुण मंडळ सावंत गल्ली आणि करमाळा तालुका हमाल पंचायत यांच्या वतीने करमाळ्यात विविध कार्यक्रम झाले. जामखेड रोड वरील सावंत फार्म हाऊस येथे कीर्तन, रक्तदान शिबिर आणि श्रीदेविचामाळ येथील मूकबधिर शाळेत अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. एस. पी. लुणावत, नरसिंह चिवटे, हभप विलास जाधव, भीमराव लोंढे, निशांत खारगे, दीपक चव्हाण, सचिन काळे, मनोज राखुंडे आणि जान्हवी सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. राहुल सावंत यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला आमदार संजयमामा शिंदे यांचे चिरंजीव यशवंत शिंदे, शहाजी देशमुख, डॉ. वसंत पुंडे, प्रा. रामदास झोळ, लालासाहेब जगताप, शेखर गाडे, बापूराव देशमुख, राजेंद्रसिंह राजेभोसले, उद्धव माळी, तानाजी झोळ, सुजित बागल, प्रभाकर शिंदे, किसन शिंदे, विठ्ठल शिंदे, अंकुश शिंदे, संतोष पाटील, आर. आर. मोरे, डॉ. हरिदास केवारे, कन्हैयालाल देवी, अमोदशेठ संचेती, अल्ताफशेठ तांबोळी, मदन देवी, जितेंद्र लुनिया, नितीन घोलप, महादेव फंड, राजेंद्र आव्हाड, ॲड. नवनाथ राखुंडे, प्रवीण जाधव, प्रकाश झिंजाडे, आशिष गायकवाड, बिभीषण आवटे, संतोष वारे, डॉ. रोहन पाटील, डॉ. विशाल शेटे, डॉ. बाबूराव लावंड, डॉ. अनुप खोसे, ॲड. अजित विघ्ने आदी उपस्थित होते.