चिपळूण : वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या वतीने पाच दिवसाचा कृषी व पशुधन कृषी महोत्सव होणार आहे. रविवारी (ता. ५) माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. ९ जानेवारीपर्यंत हा महोत्सव असणार आहे. चिपळूण येथील बहादूर शेखनाका येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मैदानात हा महोत्सव आहे. या महोत्सवाची संपूर्ण तयारी करण्यात आली असून याचा लाभ जास्तीतजास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी केले आहे.

गेल्या वर्षी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या महोत्सवातून शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायांसाठी दिशा मिळाली. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पशुधन वाढत असल्याचे चित्र आहे. यावर्षीही या कृषी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन रविवारी सकाळी १० वाजता माजी केंद्रीय कृषिमंत्री पवार यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू संजय भावे हे प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. यावेळी रक्तदान शिबिर होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता माऊली रिंगण सोहोळा तर ७.३० वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष यादव यांचा सुवर्ण महोत्सवी अभिष्टचिंतन कार्यक्रम होणार आहे.

सोमवारी (ता. ६) सकाळी १० वाजता सुदृढ, निरोगी, सुंदर, पशुधन स्पर्धा होणार आहे. सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत डॉग शो होणार आहे. स्पर्धेतील डॉग व कॅट शो मालकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. ७) गोड पदार्थ पाककला सकाळी १० ते २ वाजेपर्यंत कॅट शो सायंकाळी ४.३० ते ६.३० वाजेपर्यंत बुधवारी (ता. ८) सकाळी ८ वाजता सर्वात जास्त दूध देणारी गाय, म्हैस सकाळी १०.३० वाजता शेतकऱ्यांना प्रशिक्षण सकाळी ११.०० वाजता पशुधन कोकण कपिला स्पर्धा आणि गुरुवारी (ता. ९) सकाळी १० ते २ तिखट पाककला स्पर्धा होणार आहे. या प्रदर्शनात कॅफेटेरिया, २४ तास जनरेटर सुविधा, भव्य पार्किंग व्यवस्था, टॉयलेट्स फायर स्टेशन सुविधा असणार आहे.

खते, जैविक खते आणि शेतीच्या नवीन पद्धती, कृषी अवजारे, यंत्रे, कृषीविषयक अत्याधुनिक साहित्य बि- बियाणे, कृषी रसायने (जंतुनाशके, किटकनाशके, पीकवाढीसाठी उपयुक्त रसायने इत्यादी), फळ व फुले उत्पादन संबंधीत विविध पद्धती व आधुनिक तंत्रज्ञान अत्याधुनिक फवारणी यंत्रे (ठिबक सिंचन, फवारा पंपसेट, स्टार्टर इ.), अत्याधुनिक हायटेक कृषी विभाग (ग्रीन हाऊस, मशरूम उत्पादन, अॅक्चॉकल्चर, वायोटेक्नॉलॉजी, टिश्यू कल्चर वैगरे) ग्रीनहाऊस उभारणी, शेततळे व्यवस्थापन अशा संस्था सहभागी होणार आहेत.

या प्रदर्शनात १०० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असून चर्चासत्रासाठी विशेष कक्ष, पशु पक्षी व प्राणी प्रदर्शन तर जनावरांचा गोठा विशेष आकर्षण असणार आहे. प्री फॅब्रिकेटेड स्टॉल्स, वैविध्यपूर्ण अवजारे, मान्यवरांच्या भेटी व मार्गदर्शन असणार आहे. पिलरलेस दोन शामियान परदेशी भाजीपाला या प्रदर्शनात असून विविध मनोरंजनाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. एकंदरीत भव्य प्रदर्शन असून शेतकऱ्यांना या प्रदर्शनाचा मोठा लाभ होणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *