करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदी परिसरात आज (शनिवार) सकाळपासून ड्रोनच्या घिरट्या सुरु आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ड्रोनद्वारे कशाची टेहाळणी केली जात आहे याचे कोडे उलगडले आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर संबंधित विभागाने याचा खुलासा केला आहे.
नगर जिल्ह्यातून येणाऱ्या सीना नदीवरील तरटगाव बंधारा, पांडुरंग वस्ती परिसर, पोटेगाव बंधारा व साळुंखे वस्ती व आळजापूर येथे नागरिकांनी ड्रोनच्या घिरट्या पहिल्या होत्या. काही नागरिकांनी या ड्रोनचे रेकॉर्डिंग केले होते. कशामुळे हे ड्रोन फिरत आहे हे समजत नसल्याने भीती निर्माण झाली होती. त्याचा खुलासा संबंधित ड्रोनधारकांनी केला आहे.
राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या श्रीगोंदा येथील कुकडी पाटबंधारे उपविभागचे उपकार्यकारी अभियंता यांच्या आदेशाने सीना नदी ० ते १२१ किलोमीटर, खार नदी ० ते ४८ किलोमीटर, विंचरणा नदी ० ते ३६ किलोमीटर व इतर उपनदीची पूररेषा निश्चित करण्याचे काम सुरु आहे. जलशास्त्रीय अभ्यासक, महत्तम पूरपातळीची संगणकीय प्रणालीद्वारे मोजणी करून निळी (निषेधक), लाल (पूररेषा व नियंत्रक) तसेच पिवळी पूररेषा आखणी करण्याचे काम सुरु आहे.
करमाळा तालुक्यात सीना नदी परिसरात ड्रोनच्या घिरट्या! नागरिकांमध्ये भीती