करमाळा (सोलापूर) : मद्यप्राशन करून दुचाकी चालवल्याप्रकणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शशिकांत रामचंद्र सरडे (रा. करंजे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. करमाळा शहरातील श्री देवीचामाळ बायपास रोडवर ही कारवाई करण्यात आली आहे. वेडीवाकडी दुचाकी चालवत असल्याने संशय आल्याने पोलिसांनी सरडेला पोलिसांनी थांबवले तेव्हा त्याची ब्रेंथ ऍनीलायझरद्वारे त्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल दीपक कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.