Accident near Mangi One on the motorcycle was killed the other seriously

करमाळा (सोलापूर) : करमाळा- नगर महामार्गावर अपघात होऊन एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज (शुक्रवारी) सायंकाळी ८.३० वाजताच्या सुमारास मांगी येथील वीज उपकेंद्राजवळ हा अपघात झाला, असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातातील ठार झालेली व जखमी झालेली व्यक्ती कामोणे येथील आहेत. ते मोटारसायकलवर कामोणेकडे येत असताना त्यांना समोरुन आलेल्या टेंम्पोने धडक दिली असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यातील एकजण ठार झाला तर एकाला बार्शी येथे पाठवण्यात आले असल्याचे समजत आहे. संतोष काशीनाथ देवमुंडे (42) असे ठार झालेल्या तर अश्रु ज्योतीबा देवमुंडे (60) असे जखमीचे नाव आहे.

कामोणेचे सरपंच रमेश खरात हे उपजिल्हा रुग्णालय येथे आहेत. अपघाताची माहिती समजताच पोलिस उपअधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्तांना सामाजिक कार्यकर्ते शहाजी ठोसर, बापू घरबुडवे, सागर पुराणिक यांच्यासह कामोणे, जातेगाव व मांगी येथील नागरिकांनी मदत केली. सालसे येथील अपघाताची घटना ताजी असतानाच आज पुन्हा हा अपघात झाला आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *