Photo post of Khashaba Cinema Muhurta by Director Nagraj Manjule

मराठा चित्रपटसृष्टीला नवे वळण देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर ‘खाशाबा’च्या मुहूर्ताचा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर चाहत्यांनी सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असल्याचंही म्हटले आहे. फेब्रुवारीमध्ये ते बायोपिक चित्रपट बनवणारा असल्याची घोषणा केली होती. पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवण्याचं त्यांनी सांगितलं होते. तेव्हापासून चाहत्यांमध्ये या सिनेमाची उत्सुकता होती. आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

https://www.instagram.com/nagraj_manjule/?utm_source=ig_embed&ig_rid=a2d7300d-7b4a-4dd4-9f5b-0dd5dcd331d1

दिग्दर्शक मंजुळे यांनी फोटो पोस्ट करत त्याला ‘चांगभलं’ असे कॅप्शन दिले आहे. ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ”घर बंदूक बिरयाणी’, ‘झुंड’नंतर नागराज यांचा आता ‘खाशाबा’ हा सिनेमा असणार आहे. मराठीसह त्यांनी हिंदी सिनेमे ही केले आहेत. मंजुळे यांनी म्हटले आहे की, ‘ऑलम्पिकच्या इतिहासात देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पहिलवान खाशाबा जाधवांच्या आयुष्यवर मला चित्रपट करायला मिळतोय ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. फँड्री, सैराटनंतर ‘खाशाबा’ हा माझा तिसरा मराठी चित्रपट असेल जो मी दिग्दर्शित करतोय. जिओ स्टुडिओ, ज्योती देशपांडेंसोबत ही पहिलीच फिल्म आहे. निखिल साने फँड्री पासून सोबत आहेतच. हा प्रवास नक्कीच रंजक आणि संस्मरणीय असेल…!

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *