Pensioners urged to submit investment information by 15 December

सोलापूर : निवृत्तीवेतन धारकांनी आयकर नियमानुसार वजावटीसाठी केलेली गुंतवणूक, बचत, विमा पॉलिसी, पॅनकार्डची माहिती फॉर्म12 बीबीमध्ये भरुन गुंतवणुकीच्या सर्व कागदपत्रासहित 15 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय, सोलापूर येथे जमा करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी स. र. मोमीन यांनी केले आहे.

आयकर वसुलीचे नवीन Section 115BAC नुसार आर्थिक वर्ष 2023- 24 च्या आयकर गणनेसाठी New Tax Regime व Old Tax Regime असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहेत. वरीलपैकी योग्य असणारा Tax Regime किंवा Old Tax Regime निवडावा तसेच याकरिता आवश्यक असल्यास आपल्या नजीकच्या सनदी लेखापालांचीही मदत घ्यावी. आपण निवडलेले पर्याय कोषागार कार्यालयास वैयक्‍तीकरित्या / पोस्टाने । इमेलव्दारे आपले नाव PPO NO. BANK व BRANCH सहीत 15 डिसेंबरपर्यंत कळविण्यात यावेत. आपण निवडलेल्या Tax Regime नुसार देय होणारी टीडीएस वजाती करता येईल. जे निवृत्तीवेतनधार Tax Regime ची निवड वेळेत कळवणार नाहीत, त्यांची पुर्वीप्रमाणे Old Tax Regime मध्ये वजाती करावी लागेल, याची नोंद घ्यावी, असे पत्रकात नमूद आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *