कामोणेतील अॅड. अदिनाथ शिंदे यांचे निधन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कामोणे येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड. अदिनाथ शिंदे यांचे आज (रविवारी) पहाटे दुर्दैवी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बारामती येथे त्यांचे राहत्या घरी निधन झाले असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. कामोणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अॅड. शिंदे हे समाजकारणासह राजकारणातही सक्रीय होते. त्यांच्या अकली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *