After the construction of Ujni the subirrigation scheme in Barshi Mohol Karmala and Madha talukas is credited to Pawar Saheb and Ajit Pawar

करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणाच्या निर्मितीनंतर सीना माढा उपसासिंचन योजना, दहिगाव उपसासिंचन योजना, मोहोळची आष्टी उपसासिंचन व बार्शी उपसासिंचन योजनेचे संपूर्ण श्रेय शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जात आहे, असे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले आहे. दहिगाव उपसासिंचन योजनेला मिळालेल्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा किस्साही त्यांनी सांगितला. (After the construction of Ujni the subirrigation scheme in Barshi Mohol Karmala and Madha talukas is credited to Pawar Saheb and Ajit Pawar)

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत दहिगाव उपसा सिंचन योजनेवरील बंद नलिका वितरण प्रणालिचे भूमीपूजन आज (मंगळवार) साडे येथे झाले. यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, मांगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुजित बागल, घोटीचे सरपंच विलास राऊत, अधीक्षक अभियंता धीरज साळी, निंभोरेचे सरपंच रविंद्र वळेकर, बिटरगाव श्री येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव मुरूमकर, कार्यकारी अभियंता एम. टी. जाधवर, श्री. मुजावर, माजी सभापती चंद्रहास निमगिरे, विलास पाटील आदी उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, ‘दहिगाव उपसासिंचन योजनेची राहिलेली सर्व कामे लवकर पूर्ण करून आमच्या हस्ते त्याचे लोकार्पण व्हावे अशी इच्छा आहे. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर मोहोळ, बार्शी, माढा व करमाळा तालुक्यातील पाण्यापासून वंचित राहिलेल्या भागाला पवार यांच्या ;निर्णयामुळे पाणी मिळाले आहे. उजनी धरण सुरुवातीला १०८ टीएमसी होते. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हा विभाग असताना त्यात पाणी कोठून उपलब्ध होईल या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. तेव्हा धरणाची उंची वाढवून नवीन क्षेत्र अकव्हेजीशनची गरज नाही अशा धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय झाला. त्यात उजनी धरण होते. तेव्हा उजनीची उंची वाढवली म्हणजे भिंती वाढवल्या नव्हत्या तर फक्त ४२ गेटवरील टॉप लेव्हलच्या उंचीत वाढ करण्यात आली होती. (धरण पूर्ण क्षमतेने भरते तेव्हा त्यातून पाणी पडण्याची जागा) त्यात १९ इंचानी उंची वाढवली होती. त्यामुळे १४ टीएमसी पाणी उपलब्ध झाले होते. त्या पाण्याचे वाटप १९९४ मध्ये झाले. त्यामुळे या योजना सुरु झाल्या. त्याचे श्रेय अजित दादांना जाते. पुढे करमाळ्याचे आमदार स्व. दिगंबरराव बागल झाले. आणि माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे झाले. तेव्हा मोहोळ तालुक्यातून राजन पाटील हे पहिल्यांदाच आमदार झाले होते. बार्शी तालुक्यातून दिलीप सोपल हे आमदार होते. युतीचे सरकार होत असताना त्यांनी योजनेला सहकार्य करण्याची मागणी केली होती’, असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले, ‘दहिगाव उपसासिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी माझेही योजना सातत्याने चालवावी म्हणून अजित पवार यांच्याकडे प्रयत्न सुरु होते. यासाठी सतत पाठपुरावा सुरु होता. विभागाच्या बैठकीवेळी मी स्वतः सकाळी लवकर जाऊन अजित पवार यांना या योजनेविषयी माहिती दिली, आणि प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली. मी आमदार असताना सुरुवातीचा कोरोना काळ होता. तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्याकडेही पाठपुरावा केला आहे. जोपर्यंत फुटबॉल पर्यंत पाणी आहे तोपर्यंत योजना सुरु राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.’

‘ही योजना पूर्ण झाल्यानंतर पाणी शिल्लक राहणार आहे, त्याचेही नियोजन केले जाणार आहे. कुकडीचाही अभ्यास केला असून त्यावर उपाययोजना सुचवली आहे. त्यावरील आम्ही हक्क सोडतो ते पाणी उजनीत सोडून ते पाणी कुकडी- उजनी उपसासिंचन योजनेतून उचलण्याची परवानगी द्यावी, असा प्रयत्न सुरु आहे,’ असे आमदार शिंदे यांनी सांगितले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *