भिगवण (स्वामी चिंचोली) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिटयुशन्समधील इंजिनिअरींग विभागात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अॅण्ड डाटा सायन्स (AIDS) हा नवीन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु झाला आहे. २४ प्रवेश क्षमतेसह या शैक्षणिक वर्षांपासून हा अभ्यासक्रम सुरु झाला असून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदने (नवी दिल्ली) मान्यता दिली आहे, अशी माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिली आहे. याशिवाय पदवी विभागातील कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या प्रवेश क्षमतेस ६० वरून १२०, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरींग शाखेस ३० वरून ६०, मॅनेजमेंट विभागातील एमबीए अभ्यासक्रमास १२० वरून १८०, एसीए अभ्यासक्रमास १२० वरून १८० इतकी प्रवेश क्षमता वाढीस मंजुरी देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
प्रा. झोळ म्हणाले, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अॅण्ड डाटा सायन्स हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम परिसरातील तसेच ग्रामीण भागातील कोणत्याच संस्थेमध्ये शिकवला जात नाही. त्यामुळे जगातील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या संकल्पनेचे वाढते महत्व लक्षात घेवून ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यामध्ये मागे पडू नये म्हणून हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कॉम्प्युटर क्षेत्राच्या वाढत्या मागणीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहजतेने ग्रामीण भागातच या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता यावे म्हणून कॉम्प्युअर इंजिनिअरींग व इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरींग या अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेमध्ये वाढ केलेली आहे.
दत्तकला हा कॉम्प्युटर इंजिनिअरींग (१२० प्रवेश क्षमता) व संबंधित इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (६० प्रवेश क्षमता), इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरींग (६० प्रवेश क्षमता) अभ्यासक्रमांचे शिक्षण देणारा व त्याबरोबर एबीए व एसीए अभ्यासक्रमांचा सर्वांत जास्त प्रवेश क्षमता असलेला कॅम्पस झालेला आहे.
दत्तकलेचा निसर्गरम्य व हरित कॅम्पस, तेथील गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यातील कटिबद्धता तसेच ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीची धडपड व जागतिक स्पर्धेत टिकता यावे यासाठी वेळोवेळी राबविण्यात येणारे नाविण्यपुर्ण उपक्रम यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच शहरी भागातील विद्यार्थ्यांचा देखील प्रवेशासाठी दत्तकलेकडे ओढा वाढत चालला आहे, असे संस्थेचे उपाध्यक्ष राणा सुर्यवंशी यांनी केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर व त्या क्षेत्राशी संबंधित असलेले सर्व प्रकारचे पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी शहरी भागाकडे अधिक आर्थिक भार सोसून न जाता ग्रामीण भागातच याचे शिक्षण घ्यावे, असे आवाहन संस्थेच्या सचिव माया झोळ यांनी केले आहे.