मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एखादा मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी तिसऱ्यांदा आज (रविवारी) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. साडेतीन वर्षातील त्यांचा हा तिसरा शपथविधी आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरुवातीला अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथ सोहळा झाला होता. तेव्हा फडणवीस हे मुख्यमंत्री तर पवार हे उपमुख्यमंत्री होते. हे सरकार दीड दिवसात कोसळले होते. महाविकास आघाडी स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर पवार दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर वर्षभरापूर्वी शिवसेनेत फूट पडली आहे आणि शिंदे मुख्यमंत्री झाले. तर फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. आता पुन्हा एखादा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना व भाजपच्या युतीत राष्ट्रवादीचे पवार हे सामील झाले आहेत. पवार हे शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. छगन भूजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे व दिलीप वळसे पाटील यांनीही शपथ घेतली आहे.