करमाळा (सोलापूर) : शैक्षणिक प्रवेश, नोकर भरतीसाठी लागणाऱ्या दाखल्याना १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया यांनी निर्देश दिले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सध्या शासकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या चार ते पाच पटीने वाढलेली आहे. त्यामुळे महाआयटीच्या सर्व्हरवर अतिरिक्त भर पडत आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने निर्गमित होणाऱ्या दाखल्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे शैक्षणिक प्रवेश व नोकरीसाठी लागणारे दाखले वेळेत मिळू शकत नाहीत. ही अडचण दूर करण्यासाठी संबंधित ठिकाणी दाखले स्वीकारण्यास १५ दिवसाची मुदतवाढ देण्यात येत आहे.

