करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा मतदारसंघाच्या सर्वांगीन विकास करण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करावे, असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.

निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळा व सावडी येथे आज (सोमवारी) सभा झाल्या. सभेनंतर करमाळा शहरातील मुख्य मार्गावरून पदयात्रा काढत श्री छत्रपती शिवाजी महाराज, महाराणाप्रताप, महात्मा गांधी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले या महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी निंबाळकर व आमदार शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी व हलगीच्या कडकडाटात ही पदयात्रा काढण्यात आली होती.

सावडी येथे सकाळी तर करमाळा येथे सायंकाळी ५ वाजता सभा झाली. माजी आमदार जयवंतराव जगताप, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष भारत अवताडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे, भाजपचे जगदीश अग्रवाल, ऍड. अजित विघ्ने तालुकाध्यक्ष रामा ढाणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप, महिला आघाडीच्या प्रियांका गायकवाड, आरपीआयचे (ए) अर्जुन गाडे, बाळासाहेब टकले, शिंदे गटाचे समर्थक सूर्यकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, बबनराव मुरूमकर, अपसर जाधव, सरपंच किरण फुंदे, दीपक चव्हाण, माजी सरपंच आशिष गायकवाड, सरपंच तानाजी झोळ, अजय बागल, संजय शिलवंत, अमोल पवार यांच्यासह महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), रासप, रयत क्रांती व आरपीआय (ए) पदाधिकारी उपस्थित आहेत.

‘खासदार निंबाळकर यांनी केंद्रातील योजना आणण्यासाठी काम केले आहे. तालुक्याचे अनेक महत्वाचे विषय होते, ते सोडवण्यासाठी मीही प्रयत्न केला आहे, असे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले आहे. आमदार शिंदे म्हणाले, प्रकल्पातील भूसंपादनाचे पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि ते मिळाले आहेत. तालुक्यातील विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत. पर्यटन, समाज कल्याण विभाग, क्रीडा व कृषी भागातून आपल्याला निधी मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून जातेगाव- टेंभुर्णी या महामार्गाचे काम आपण मार्गी लावले आहे, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले आहे. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार जगताप यांचेही भाषण झाले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *