करमाळा (सोलापूर) : साडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अण्णासाहेब आडेकर यांची निवड झाल्याबद्दल माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. जेऊर येथील ग्रामपंचायत सभागृहात हा सत्कार झाला. यावेळी उपसरपंच मंगलताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य पाटील, श्रीपती काशीद, सोनाली खराडे, ज्ञानेश्वर तुपे, योगेश लोंढे, सचिन रोकडे, अक्षय पाटील, नागेश लाळगे यांचाही सत्कार करण्यात आले.
भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अर्जून सरक, पाटील गटाचे नेते पृथ्वीराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप कोठारी, संतोष वाघमोडे, माजी उपसरपंच राजाभाऊ जगताप उपस्थित होते. माजी आमदार पाटील म्हणाले, करमाळा तालुक्यातील पुर्व भागात सिंचन क्षेत्र वाढवण्यात आपल्याला यश आले आहे. यापुढे साडेसह पुर्व भागातील सर्व ग्रामपंचायतींना निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. या भागातील नागरीकांना चांगल्या ग्रामसुविधा मिळाव्यात, भौतिक सुविधासह गावातील आरोग्य, ग्रामस्वच्छता, गावांतर्गत रस्ते, वाडी वस्तीवरील रस्ते, पिण्याचे पाणी आदीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष निधीची मागणी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. आभार स्विय सहायक सूर्यकांत पाटील यांनी मानले.